मानवी जगण्याची एकूण होरपळ आणि प्राथमिक प्रेरणांची रटरट व्यक्त करण्यासाठी ‘आधुनिक कथे’सारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही
सतीश आयुष्याला थेट भिडणारा माणूस आहे. अशी माणसं जे निरखतात ते जगातल्या श्रेष्ठ माणसांना विचाराअंती सुचलेलं असतं. या कथेतला अविनाश हा सतीशचा जुळा भाऊ वाटतो. त्याला कुठल्याही गोष्टीच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले बारीकसारीक भावनांचे, प्रेरणांचे, इच्छांचे, आकांक्षांचे आणि असूयेचे सुवर्णकण दिसून जातात. त्यांना आपल्या कथेत आणून तो आपल्या कथा अर्थगर्भ तर करतोच, पण त्या वाचताना वाचक सर्वांग तल्लखी अनुभवतो.......